आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक विचित्र घटना कर्नाटक राज्याच्या रामनगर जिल्ह्यातल्या होसाहल्ली गावात घडली. एका व्यक्तीच्या अंत्यविधी झाठी जमा झालेल्या लोकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. ह्या हल्ल्यात अनेक लोकं जखमी झाले आहेत. जवळ असलेल्या एका वडाच्या झाडावर एक मधमाश्यांचे पोळे होते. बाजूला सुक्या गवतात लागलेल्या आगीमुळे तिथे धूर निघत होता. आणि ह्या धुरामुळे मधमाश्या बिथरल्या आणि त्यांनी लोकांवर हल्ला केला. लोक प्रेताला सोडून पळू लागले. थोडे वातावरण निवळल्यावर अंत्यविधी पूर्ण करण्यात आला. एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमींना जवळील मगादी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews